मालवाहू रिक्षाचालकाची लुट करणा-या दोघांना अटक

On: December 16, 2023 9:52 PM

जळगाव : मालवाहू रिक्षा चालकास मारहाण करुन त्याच्या खिशातील रोख रक्कम हिसकावून नेणा-या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश भिमराव सपकाळे (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) व त्याचा साथीदार गोपाळ रविद्र पाटील (रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.  

दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मालवाहू रिक्षा चालक गोपाळ एकनाथ शिदे (रा. मुसळी ता. धरणगाव) हे  त्यांच्या ताब्यातील मालवाहू रिक्षाने सुप्रिम कंपनीत मालाची डिलीव्हरी करण्यासाठी आले होते. कंपनीच्या गेट समोर ते उभे असतांना मोटारसायकलने आलेल्या दोन अनोळखी ईसमांनी त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील 3500 रुपये जबरीने हिसकावून घेतले होते. या घटनेप्रकरणी दोघा अज्ञात इसमांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश भिमराव सपकाळे याने त्याचा साथीदार गोपाळ रविंद्र पाटील याच्या मदतीने केला असल्याची माहिती पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांना समजली. त्यानुसार त्यांनी आपले सहकारी पोउनि निलेश गोसावी, पोउनि दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, योगेश बारी, सचिन पाटील, किशोर पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे आदींना पुढील तपासकामी रवाना केले. दोघांना तपास पथकाने ताब्यात घेतले. अधिक चौकशीअंती दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. दोघांना न्या. श्रीमती सुवर्णा कुलकर्णी याच्या न्यायालयात हजर करण्यातआले. दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील राकेश सपकाळे याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment