शस्त्रासह फिरणा-या दोघा हद्दपारांविरुद्ध गुन्हा

On: December 17, 2023 9:17 AM

जळगाव : जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असतांना देखील आपल्या कब्जात विनापरवाना शस्त्र बाळगून फिरणा-या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत प्रताप चौधरी आणि स्वप्निल उर्फ गोलु धर्मराज ठाकुर (दोघे रा. डीएनसी कॉलेज शंकरराव नगर जळगाव) अशी दोघांची नावे आहेत.

जळगाव शहरातील तुकारामवाडी परिसरात निशांत याच्या कब्जात सुरा आढळून आला. त्याला दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पांडे चौक नजीक रामदेव बाबा मंदीराजवळ स्वप्निल ठाकुर याच्या कब्जात देखील सुरा आढळून आला. दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास अनुक्रमे हे.कॉ. रामकृष्ण पाटील व पोलिस नाईक सुधीर सावळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment