नाशिक : लॉकडाऊन काळात प्रवासासाठी आवश्यक ई-पासचा काळा बाजार कमी अधीक प्रमाणात सुरु असल्याचे दिसून आले आहे. नाशिक पोलिसांनी बनावट ई पास तयार करणा-या तरुणास पकडल्याचे वृत्त समोर आले असून तो मनसेचा तालुका पदाधिकारी असल्याचे देखील म्हटले जात आहे.डोंबीवलीतून पकडण्यात आलेला कथीत मनसे पदाधिकारी रत्नागिरीचा रहिवासी असल्याचे सांगण्यत येते. तो दोन हजार रुपयात बनावट ई-पास तयार करुन विकत होता अशी देखील माहिती समोर आली आहे.