मामाच्या मुलीला पळवल्याचा संशय – तलवार, रॉड हल्ल्यात तरुण जखमी

On: December 20, 2023 9:45 AM

जळगाव : पळून गेलेल्या मामाच्या मुलीला गावातील तरुणानेच पळवल्याच्या संशयातून तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तलवार, लोखंडी रॉड व लाठा काठ्यांचा वापर करण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी सहा जण व त्यांचे दोन अनोळखी साथीदार अशा सर्वांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगव तालुक्यातील एका गावात घडलेल्या या घटने प्रकरणी जखमी तरुणाच्या काकाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार प्रविण संगेले पुढील तपास करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment