सट्टा जुगारावर रामानंद नगर पोलिसांचा छापा

On: August 28, 2020 5:46 AM

जळगाव : जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात रामानंद नगर पोलिसांनी सट्टा जुगार अड्ड्यावर गुरुवारी दुपारी छापा घालून कारवाई केली. या कारवाईत योगेश समाधान न्हावी यास अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून सहाशे चाळीस रुपये रोख व मिलन मटका नावाच्या सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. शंकर भोसले याच्या सांगण्यावरुन आपण हा जुगार चालवत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी पोलिस नाईल विश्वनाथ बाबुलाल गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा योगेश समाधान न्हावी (२१) रा.शिवाजी नगर,जळगाव तसेच शंकर भोसले, रा.शिवाजी नगर,राजवाड़ा जळगाव.यांचे विरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ),भा.द.वि. कलम १०९ नुसार दाखल करण्यात आला. या कारवाईत पो.नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.राजेश शिंदे, स.फौ. गोपाल चौधरी, पो.ना. रविंद्र पाटील, पो.कॉ.प्रविण यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment