तमाशा बघण्यास गेलेल्या तरुणाचा खून

On: December 27, 2023 9:56 AM
crimeduniya

जळगाव : तमाशा बघण्यास गेलेल्या तरुणाचा खून झाल्याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज ज्ञानेश्वर निकम असे खून झालेल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या हनुमंतखेडा ता. सोयगाव येथील रहिवासी तरुणाचे नाव आहे.

पाचोरा तालुक्यातील बदरखे या गावी यात्रेनिमित्त तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. तमाशा बघण्यासाठी मयत मनोज निकम हा आला होता. यावेळी तमाशा असलेल्या जागेनजीक मनोज याचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी हत्याराने पोटावर, पाठीवर आणि खांद्यावर मारहाण करून जीवे ठार मारले. या घटनेप्रकरणी मयत रहात असलेल्या गावचा रहिवासी नंदकिशोर शिवदास पाटील या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment