भल्या पहाटे लक्झरी बस पाण्यात?

On: August 28, 2020 10:07 AM


शिरपूर : धुळ्याकडून शिरपूरच्या दिशेने आज पहाटेच्या निरव शांततेत भरधाव वेगाने येणारे अज्ञात वाहन मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे पुलावरुन पाण्यात पडल्याची घटना घडली. पाण्यात पडलेले वाहन नेमके कोणते होते याची माहिती समजू शकले नाही. मात्र हे वाहन लक्झरी बस असल्याची भिती आणी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास हे अज्ञात वाहन धुळ्याकडून येत होते. त्यावेळी झोपेच्या धुंदीत चालकाला डूलकी लागली त्याच्या ताब्यातील वाहन तापी पुलाचे कठडे तोडून पाण्यात पडले. या घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या प्रमाणात पुलाचे कठडे तुटले आहे त्या प्रमाणात पाण्यात पडलेले वाहन हे मोठे असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment