पोलिसावर चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा

On: January 1, 2024 10:42 AM

जळगाव : पिता पुत्रामधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचा-यावरच चाकू हल्ला झाल्याची घटना भुसावळ शहरात घडली. या घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील गडकरी नगरानजीक शिवदत्त नगर परिसरात हा प्रकार घडला. अक्षय चव्हाण असे जखमी पोलिस कर्मचा-याचे नाव आहे.

कौटूंबिक वादातून मुलगा बापासोबत वाद घालत होता. त्यामुळे त्रस्त बापाने पोलिसांना 112 हेल्प लाईन क्रमांकावर फोन करुन मदत मागितली होती. पोलिसकर्मी अक्षय चव्हाण हे घटनास्थळी आल्यानंतर तरुणाची समजूत घालत होते. त्यावेळी संशयीत तरुणाने स्वयंपाक घरातील चाकू आणून पोलिस कर्मचारी अक्षय चव्हाण यांच्यावर थेट हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. दरम्यान चाकू हल्ला करणारा तरुण सुनिल वेकन्ना हा फरार झाला. या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक मंगेश बेंडकोळी करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment