थर्टी फर्स्टच्या पार्टीला गेला आणि बेपत्ता झाला

On: January 3, 2024 9:58 AM

जळगाव : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मित्रांसोबत पाचोरा येथे पार्टीला जातो असे सांगून घरातून गेलेला तरुण बेपत्ता झाला आहे. जयेश अशोक सैंदाणे असे प्रज्ञा कॉलनी कांताई नेत्रालयच्या मागे निमखेडी रस्त्यावर राहणा-या बेपत्ता तरुणाचे नाव आहे.

जयेश सैंदाणे हा तरुण 31 डिसेंबरच्या दुपारी चार वाजता घरातून निघाला. पाचोरा येथे जात असल्याचे सांगून घरातून गेलेला जयेश आजपर्यंत घरी आला नाही. त्यामुळे कविता बावीस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला त्याच्या बेपत्ता होण्याबाबत मिसींग दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ. रामकृष्ण इंगळे करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment