जळगाव : सात वर्षांपूर्वी एक वर्षासाठी हद्दपार केल्यानंतर देखील समाजात दहशत निर्माण करण्याची सवय जळलेल्या आरोपीविरुद्ध पुन्हा दोन वर्षासाठी हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे आकाश भास्कर विश्वे (रा. भगवा चौक सुप्रीम कॉलनी जळगाव) असे हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आकाश विश्वे याची एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कॉलनी परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याच्याविरुद्ध सन 2014 पासून आठ गुन्हे दाखल आहेत. त्याची दहशत लक्षात घेत पोलिस प्रशासनाने त्याला सन 2016 मधे एक वर्षासाठी हद्दपार केले होते. मात्र त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या.
एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक जयपाल हिरे व त्याचे सहकारी सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. गणेश शिरासाळे, महिला हे.कॉ.निलोफर सैय्यद, पो.ना.सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे, नरेंद्र बारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. आकाश विश्वे यास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोडण्यात आले आहे.