विवाहितेचे तरुणा सोबत जुळले प्रेम-संबंध — विषप्राशन करत पतीने केला मृत्युशी संबंध

On: January 10, 2024 2:06 PM

जळगाव : पत्नी व तिच्या प्रियकराच्या त्रासाला वैतागून तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याच्या आरोपाखाली दोघा प्रेमींविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्याच्या एका गावातील विवाहीतेचे त्याच गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्या विवाहितेच्या पतीच्या मोबाईलवर तिचा प्रियकर कॉल करत असे . पतीच्या मोबाईलवर ती विवाहीता आणि तिचा गावातील प्रियकर नेहमी बोलत असे. हा प्रकार विवाहितेच्या पतीला आवडत नव्हता. त्यातून दोघा पती पत्नीत वाद होत असे.

ती विवाहिता तिच्या पतीसोबत वाद घालून घटस्फोटाची मागणी करत होती. तसेच तिचा प्रियकर देखील तिच्या पतीवर तिला घटस्फोट देण्यासाठी दडपण टाकत होता. पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांच्या त्रासाला वैतागून तिन महिन्यांपुर्वी तरुणाने विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली होती. या घटनेप्रकरणी मयत तरुणाच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर पोलिस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक जयसिंग राठोड पुढील तपास करत आहेत.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment