उप प्रादेशिक परिवहन कार्यालय झाले सॅनीटाईज

On: August 28, 2020 1:59 PM

जळगाव : जळगांव जिल्हा मोटर ड्रायव्हींग स्कूल ओनर्स असोसिएशन व सुधानंदा चॅरिटेबल ट्रस्ट,जळगांव, यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय संपूर्ण सॅनिटाईझ करण्यात आले. एमआयडीसी जळगांव येथील जगप्रसिध्द डॉ सुमोज लॅब प्रा.लिमिटेड यांनी तयार केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे “कोरोनाश” या सॅनिटाईझरचा वापर यावेळी याठिकाणी करण्यात आला. अतिशय आधुनिक पध्दतीच्या स्प्रे पंपाचा वापर करत अधिकारी वर्गाचे कॅबिन, टेबल, खुर्च्या, खिडक्या, दरवाजे यांच्यावर स्प्रे करण्यात आला.

कोरोनाश सॅनिटाइझर हे टेबल खुर्चीच्या पृष्ठभागावर तिन महिन्यापर्यंत किटाणूंचा नाश करते. भारतातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळेकडून कोरोनाश प्रमाणित करण्यात आले आहे. या प्रसंगी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, सुबोध चौधरी, सुनील चौधरी,सौदर्या चौधरी,सुमोल चौधरी, संजना चौधरी, जळगांव जिल्हा मोटर ड्रायव्हींग ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष रामभाऊ शिरसाट,सचिव किरण अडकमोल, सहसचिव नत्थु अहिरे, रईस मिर्झा, सुनील ठाकूर,सुनील पाटील, रमिज देशमुख, इकबाल मिर्झा आदी उपस्थित होते..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment