इंडियन आयडल फेम रेणू नागर अत्यवस्थ

On: August 28, 2020 4:16 PM

इंडीयन आयडल फेम रेणू नागरचा प्रियकर रवी नट राने काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्याने गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. प्रियकराच्या आत्महत्येची माहिती समजल्यानंतर प्रेयसी रेणू नागर बेशुद्ध झाली असून तिला उपचारासाठी मित्तल हॉस्पीटलमधे आयसीयूत दाखल करण्यात आले आहे.राजस्थानच्या अलवर या शहरातून गायिका रेणू नागर पुढे आली होती. रवी नट आणि रेणू नागर हे प्रेमीयुगल घरातून रफू चक्कर झाले होते.

रेणूच्या पालकांनी रवी नट याच्याविरुद्ध पोलिसात रेणूला पळवुन नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोघे प्रेमी परत आले होते. गायिका रेणूकाचा जवाब घेतल्यानंतर त्याला सोडून दिले होते. त्यानंतर प्रियकर रवी नट याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे वृत्त समजल्यानंतर गायिकेची तब्येत बिघडली. तिच्यावर उपचार सुरु आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment