तोतया अधिका-यांनी मागितली गुटखा विक्रेत्याकडून खंडणी

On: January 20, 2024 8:54 PM

जळगाव : औषध प्रशासन अधिकारी नसतांना तसेच कारवाईचे कोणतेही अधिकार नसतांना गुटखा विक्रेत्याला कारवाईची भिती घालून त्याच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागणा-या तिघांविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील जयहिंद कॉलनी भागातील गुटखा विक्रेत्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.

राहुल शिवाजी देवकते (रा. साकटी रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर), विनायक सुरेश चवरे (रा. गोविंदपुरा सोलापूर) आणि लक्ष्मण ताड अशा तिघांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. अजित सावळे पुढील तपास करत आहेत. गुटखा विक्री करणा-यांच्या मनात भीती घालून त्यांच्याकडून मिळेल ते पदरात पाडून पोबारा करणा-या टोळ्या जिल्ह्यात फिरत असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment