पाचोरा शहरात घरफोडी – रोख रकमेसह सात लाखांचा ऐवज चोरी

On: January 21, 2024 11:07 AM

जळगाव : पाचोरा शहराच्या स्टेट बॅंक कॉलनी परिसरातील घराच्या बेडरुमच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी प्रवेश करत रोख रक्कम तसेच 7 लाख 21 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला आहे. या घटनेप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावर स्टेट बॅंक कॉलनी परिसरात दिनेश एकनाथ तावडे हे व्यावसायीक राहतात. त्यांच्या घराच्या बेडरुमच्या खिडकीचे गज कापून खिडकीवाटे अज्ञात चोरट्यांनी 20 जानेवारीच्या रात्रप्रहरी प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील  7 लाख 21 हजार रुपये किमतीचे 23 तोळे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व कागदपत्रे तसेच पॅंटच्या खिशातील रोख 7 हजार रुपये असा मुद्देमाल चोरुन नेला. या घटनेप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधार कार्ड, मतदान कार्ड, एटीएम कार्डदेखील चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. चांगल्या प्रकारे माहितगार चोरट्यानेच हे काम केले असावे अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक योगेश गणगे पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment