प्रभु श्रीराम मिरवणूकीदरम्यान दगडफेक

On: January 23, 2024 10:52 AM

जळगाव : श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने आयोजीत शोभा यात्रेच्या मिरवणूकीदरम्यान झालेल्या दगडफेकीत दोघांना दुखापत झाली असून वाहनांचे देखील नुकसान झाले. रावेर येथे झालेल्या या घटने प्रकरणी प्राणाघातक हल्ला तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्या येथे प्रभु श्रीराम यांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या निमीत्ताने संपुर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण होते. रावेर येथे त्या अनुशंगाने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीच्या बंदोबस्तादरम्यान पोलिसांना जीवे ठार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने दगड, विटा मारुन फेकण्याचा प्रकार घडला. त्यात प्रभाकर रावजी महाजन आणि त्या परिसरात राहणारा शेख बुरहान शेख आसिफ या दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

याशिवाय सुमारे पंचवीस ते तिस जणांनी बंदोबस्तावरील पोलिसांसह लोकांच्या दिशेने दगडफेक केली. झालेल्या दगडफेकीच्या घटनेत परिसरातील घरांचे आणि वाहनांचे नुकसान झाले.  चौदा जणांना अटक करण्यात आली असून स.पो.नि. गणेश धुमाळ पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment