विळा उगारुन  विवाहीतेने केले दोघांना जखमी

On: January 29, 2024 10:04 AM

जळगाव : “तु माझे आयुष्य बरबाद केले आहे” असे म्हणत विळ्याने वार करुन दोघांना जखमी करणा-या  विवाहीतेविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्याच्या बोर्हेडा या  गावी जितेंद्र एकनाथ पाटील व त्याचा मित्र अरुण पाटील असे दोघेजण मराठी शाळेच्या मैदानावर बोलत उभे  होते. त्याचवेळी जुन्या वादाच्या कारणातून एक  विवाहीता त्याठीकाणी आली. सोबत असलेल्या पिशवीतून विळा काढून तिने जितेंद्र पाटील यास “तु  माझे आयुष्य बरबाद केले आहे” असे  म्हणत विळ्याने त्याच्यावर हल्ला केला. या  हल्ल्यात जितेंद्र पाटील याच्या डाव्या हाताच्या मनगटासह डोक्याला दुखापत झाली.

या दुखापतीची घटना बघून जितेंद्र पाटील याची वहिणी वाद  सोडवण्यासाठी आली असता विवाहीतेने तिच्या उजव्या हातावर देखील विळ्याने दुखापत केली. दोघांना विळ्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शाम  तांबे करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment