जळगाव जिल्ह्यातून दोघे गुन्हेगार हद्दपार

On: January 29, 2024 8:00 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून दोघा गुन्हेगारांना हद्दपार दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले  आहे. आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे आणि गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे (रा. कांचननगर जळगाव) अशी दोघांची नावे आहेत. या दोघांविरुध्द शनिपेठ, जिल्हा पेठ, जळगांव शहर, जळगांव तालुका, एरंडोल पोलीस स्टेशनला खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत, दुखापत, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी, मालमत्तेचे नुकसान या सदराखाली एकुण तेरा गुन्हे दाखल आहेत.

दोघा गुन्हेगारांचा हद्दपारीचा प्रस्ताव शनिपेठ पोलिस स्टेशनच्या माध्यमातून तयार करण्यात आला. पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने त्याला मुर्त स्वरुप दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.  किसनराव नजन पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी याप्रकरणी कामकाज पुर्ण केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment