व्यावसायिकास नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीसह ऑनलाईन खंडणी 

On: February 5, 2024 7:18 AM

जळगाव : मेसेजेस आणि व्हिडीओ कॉल करुन जळगावच्या  व्यावसायिकाच्या कामोद्दीपक भावना उत्तेजित करुन त्याचा अश्लील व्हिडीओ करण्यासह ऑनलाईन खंडणी घेतल्या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगावच्या शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकास दोघा जणांनी बनावट नावे सांगून व्हिडीओ कॉल केले. त्याची कामवासना उत्तेजित करुन त्याचे नग्न व्हिडीओ तयार केले. ते व्हिडीओ यु ट्यूब वर व्हायरल झाले असल्याचे सांगत ते डिलीट करण्यासाठी वेळोवेळी 43 लाख 3 हजार 490 रुपये खंडणीच्या रुपात ऑनलाइन स्विकारले. या दोघा बनावट नावांच्या खंडणीखोरांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. श्रीमती शिल्पा पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment