जळगाव : चार महिन्यापुर्वी दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान एका चोरट्यास अटक करण्यात आली आहे. अटकेतील चोरट्याकडून एकुण तिन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल दोन व फैजपूर पोलिस स्टेशनला दाखल एक असे तिन गुन्हे उघडकीस आले आहेत. चंद्रकांत रामदास साळुंके (रा- हिराशिवा कॉलनी, जळगांव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
दिनांक 28 सप्टेबर 2023 रोजी शेख जाफर शेख अनवर यांची मोटार सायकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरातून चोरी झाली होती. या चोरीप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजसह खब-यांची मदत घेण्यात आली. पो.नि. डॉ. विशाल जायसवाल यांच्या गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. सलीम तडवी यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्यासह पो.ना. जुबेर तडवी, पो. कॉ. अमितकुमार मराठे, पो.कॉ. मिलींद सोनवणे आदींचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने चंद्रकांत रामदास साळुंके या चोरट्यास बि.जे. मार्केट परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याने मोटार सायकल चोरीचे तिन गुन्हे उघड केले. त्याने चोरीच्या एकुण तिन मोटार सायकली काढून दिल्या आहेत. पुढील तपास हे.कॉ. विनोद भोळे करत आहेत.








