खामगावच्या गुन्ह्यातील सोनसाखळी चोरट्यास अटक

On: February 12, 2024 10:18 PM

जळगाव : बुलढाणा जिल्ह्याच्या शिवाजीनगर ता. खामगाव येथे दाखल सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीस जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने पकडले. पुढील कारवाईकामी त्याला शिवाजीनगर खामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडीत साबळे असे या सोनसाखळी चोरट्याचे व रेकॉर्डवरील आरोपीचे नाव आहे.

खामगाव येथील महिलेचे स्थानिक आईसाहेब मंगल कार्यालय परिसरातून या चोरट्याने विस हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी जबरीने हिसकावून नेले होते. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर खामगाव पोलिस स्टेशनला 11 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडीत साबळे (रा. सुप्रिम कॉलनी जळगाव) यास पो.नि. बबन  आव्हाड यांना समजलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध  पथकाने ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल केला.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पो. उप. निरीक्षक दिपक जगदाळे, परीविक्षाधिन पोलिस उप निरीक्षक अशोक काळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, पोना योगेश बारी, पोना सचिन पाटील, पोकॉ छगन तायडे, राहुल रगडे, किरण पाटील, मुकेश पाटील आदींनी या कारवाईकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment