तिन पिस्टल, चार काडतुसासह तरुणास अटक

On: February 24, 2024 6:24 PM

जळगाव : विनापरवाना तिन गावठी पिस्टल व चार जीवंत काडतुस मोटार सायकलच्या सिटखाली बाळगणा-या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातून अटक केली आहे. किशोर रामदास कोळी (रा. कांचन नगर जळगाव) असे अटकेतील तरुणाचे नाव  आहे.

जळगाव शहराच्या गणेश कॉलनी रोड परिसरातील बजरंग बोगद्याजवळ सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे किशोर कोळी यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एकुण 1 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.    पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सपोनि अमोल मारे, पोउनि गणेश वाघमारे, पोउनि गणेश चौबे, विजयसिंग पाटील, सचिन महाजन, अक्रम शेख, महेश महाजन, किरण चोधरी, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील इश्वर पाटील मपोकॉ. प्रियंका कोळी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment