सीबीआयच्या विनंतीवरुन रियाला मिळाले सरंक्षण

On: August 29, 2020 3:26 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी रियाची चौकशी सुरु आहे. या चौकशीकामी घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या जीविताला धोका असल्याचे रियानं म्हटले होते. त्यासाठी तिने काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्याबाबत सीबीआयच्या विनंतीवरुन मुंबई पोलिसांनी रियाला संरक्षण दिले आहे.

चौकशीकामी रियाला तिच्या जुहूमधील निवासस्थानापासून सांताक्रूझमधील डीआरडीओच्या रेस्ट हाऊसमधे जावे लागते. या रेस्ट हाऊसमधे सीबीआयचं पथक मुक्कामी आहे. निवासस्थान ते रेस्ट हाऊस या प्रवासादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी रियाने केली होती. रियाच्या निवासस्थानाबाहेर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा असल्यामुळे तिला घरी जाताना अडचणी आल्या होत्या. त्यानंतर तिनं सरळ पोलिस स्टेशन गाठत संरक्षणाची मागणी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment