प्राणघातक हल्ल्यातील आरोपीस अटक 

On: March 7, 2024 11:46 AM

जळगाव : भडगाव पोलिस स्टेशनला दाखल प्राणघातक हल्ल्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. रविंद्र संतोष पाटील (जाधव) रा.भडगाव पेठ ता. भडगाव जि. जळगाव असे  शिताफीने अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव  आहे. त्याच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला 5 मार्च 2024 रोजी गु.र.न. 61/24 भा.द.वि. 307, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल आहे.    

रविंद्र पाटील हा भडगाव येथे आला असून तो बाहेरगावी पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, अकरम शेख, महेश महाजन आदींना त्याला पकडण्याकामी रवाना केले होते. या पथकाने त्याला भडगाव शहरातील पेठ भागातून शिताफीने ताब्यात घेत अटक केली. पुढील कारवाईकामी त्याला भडगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment