सुरेश रैनाच्या काकांचं निधन – आयपीएलमधून माघार

On: August 29, 2020 6:54 PM

चेन्नई सुपर किंग्जचा उपकर्णधार सुरेश रैना याने आज अचानक दुबई सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. रैनाच्या काकांचे पठाणकोट येथील थरीयाल गावात अज्ञात हल्लेखोरांकडून झालेल्या हल्ल्यात निधन झाले आहे. त्या हल्ल्यात त्याच्या आत्याची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे रैना भारतात परतला.

19 ऑगस्टला रैनाचे नातेवाईक घराच्या गच्चीवर झोपले होते. त्यावेळी मध्यरात्री त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. रैनाची आत्या आशा देवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच त्याचे काका अशोक कुमार यांचे निधन झाले आहे. रैनाचे इतर नातेवाईक देखील जखमी झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment