गावठी पिस्टलसह तरुणास अटक

On: March 20, 2024 9:08 PM

जळगाव : गावठी पिस्टल स्वत:जवळ बाळगून दहशत माजवणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिष उर्फ मिठ्या ठाकुर असे भुसावळ शहराच्या गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी असलेल्या अटकेतील तरुणाचे नाव आहे. 31 हजार रुपये किमतीचे मॅगझीनसह गावठी पिस्टल व दोन  जीवंत पितळी काडतुस असा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश चोबे, हे.कॉ. महेश महाजन, प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रणजीत जाधव, मोतीलाल चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपासकामी मनिष यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment