चौघे सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार

On: March 22, 2024 10:32 AM

जळगाव : जळगाव जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणा-या चौघा सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. प्रदीप रायदास पाटील – टोळी प्रमुख (रा. पहुरपेठ ता. जामनेर), शाहरुख बनेखा तडवी – टोळी सदस्य (रा. शिवनगर पहुरपेठ ता.  जामनेर), इरफान लालखा तडवी – टोळी सदस्य (रा. ख्वाजा नगर  पहुरपेठ ता. जामनेर) आणि शेख राज शेख समद (ख्वाजा नगर पहुर पेठ जामनेर) अशी चौघा हद्दपारांची नावे आहेत. या चौघांविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला चोरी, जबरी चोरी असे एकुण पाच  गुन्हे दाखल आहेत.

या तिघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रविंद्र देशमुख, हे.कॉ. जिजाबराव कोकणे, पो.ना. ज्ञानेश्वर ढाकरे, पो.कॉ. विकास गायकवाड, गोपाळ गायकवाड आदींनी केला होता. या प्रस्तावाचे पुढील कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांचे सहकारी सहायक फौजदार युनुस शेख इब्राहीम, हे.कॉ. सुनिल दामोदरे यांनी पाहिले.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment