घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक 

On: April 8, 2024 9:49 PM

जळगाव : यावल पोलिस स्टेशनला दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील हव्या असलेल्या अट्टल गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यास पुढील तपासकामी यावल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. रवी प्रकाश चव्हाण असे या गुन्हेगाराचे नाव आहे. 

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना समजलेल्या माहितीच्या आधारे रवी चव्हाण यास जळगाव मेहरुण परिसरातील शेरा चौकातून बातमीवरून संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पो उप निरी दिपक जगदाळे, पो उप निरी दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल पंजारी, पोहेका गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, पोना योगेश बारी, पोकॉ नितीन ठाकुर, मुकेश पाटील आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment