जळगाव शहरात निर्घृण खूनाची घटना 

On: April 20, 2024 7:21 PM
crimeduniya

जळगाव : जळगाव शहराच्या आव्हाणे रस्त्यावरील जिनिंग परिसरातील शेतात एका तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आज शनिवारच्या पहाटे ही खूनाची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.  सुरेश परमसिंग सोलंकी (40) रा.गेहिज खेमला, जि.सेंधवा, मध्यप्रदेश असे मयत तरुणाचे नाव असल्याचे समजते.

आव्हाणे रस्त्यावर लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या मालकीची लक्ष्मी जीनिंग आहे. या जिनींगमध्ये मयत तरुण काम करत होता असे सांगितले जात आहे. जिनिंग परिसरातील शेतात ही खुनाची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती समजतात घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment