बस मधे चढतांना महिलांचे दागिने चोरी

On: April 24, 2024 9:36 PM

जळगाव : बसमधे चढतांना दोघा महिलांच्या पर्समधील एकुण 6 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील अजिंठा चौफुली बस स्टॉपवरुन बस मध्ये चढतांना गर्दीचा गैरफायदा घेत 21 एप्रिल रोजी हा चोरीचा प्रकार घडला. 

भुसावळ येथील दोन्ही गृहिणी आपल्या परिवारासह जळगाव येथे नातेवाईकांकडे एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त सोबत आल्या होत्या. कार्यक्रम आटोपून भुसावळला परत जातांना दोन्ही महिलांनी आपले दागिने पर्समध्ये ठेवले. अजिंठा चौफुली पासून बसमध्ये चढतांना त्यांच्या पर्समधील दागिने चोरट्यांनी शिताफीने लंपास केले. बस प्रवासादरम्यान महिलांच्या हा प्रकार लक्षात आला. एकुण 6 लाख 30 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करत आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment