रेल्वे रुळावर आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन

On: April 29, 2024 9:02 PM

जळगाव : जळगाव ते भादली दरम्यान लोहमार्गावर आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. 28 एप्रिल 2024 च्या रात्री अकरा वाजेनंतर रेल्वे लाईन खांब क्रमांक 420 -31 ते 420 – 33 दरम्यान आढळून आलेल्या या मयत इसमाने आत्महत्या केली असावी अथवा कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून तो पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून त्यात त्याचा मृत्यु झाला आहे.

मध्य रेल्वे उप स्टेशन प्रबंधक अरुण सोपान नाफडे यांनी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु असून मृतदेहाची ओळख पटवण्याकामी तसेच पुढील तजवीज होईपावेतो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला आहे.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment