तरुणीवर बलात्कार – एमआयडीसी पोलिसात गुन्हा

On: May 3, 2024 6:57 AM

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत जळगाव शहरातील तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास प्रकाश अडकमोल (रा. गेंदालाल मिल जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

संशयित आरोपी विकास अडकमोल याने या तरुणी सोबत जवळीक निर्माण केली. तिच्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. मात्र लग्न करण्यास नकार दिला. अखेर तरुणीने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठत विकास अडकमोल यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दयानंद सरवदे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment