पतीची हत्या करणाऱ्या पत्नीसह तिचे चौघे साथीदार अटक 

On: May 6, 2024 3:21 PM

जळगाव : छत्रपती संभाजीनगर येथील तरुणाची हत्या करणाऱ्या चौघांना जळगाव जिल्ह्याच्या पहुर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक सचिन सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहुर येथून अटक केली आहे. अटकेतील चौघांना छत्रपती संभाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा त्याच्या पत्नीने चौघा साथीदारांच्या मदतीने सुपारी देऊन हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

गणेश जगन्नाथ दराखे (रा. सिडको) अशी हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून झालेला गणेश दराखे याची पत्नी रूपाली हिचे सुपडू सोनू गायकवाड या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधात रुपालीचा पती गणेश हा अडसर ठरत होता. या हत्येप्रकरणी सिडको पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिडको पोलिसांनी सर्वप्रथम मयत गणेश याची पत्नी रुपाली हिला चौकशीकामी ताब्यात घेतले. तिने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील इतर चौघांची नावे निष्पन्न झाली. जळगाव जिल्ह्याच्या पहूर येथील अमोल चिंतामण चौधरी, अजय दिलीप हिवाळे, अनिकेत कडुबा चौथे (पहुर कसबे) व कु-हाड येथील सुपडू सोनू गायकवाड या चौघांची नावे या गुन्ह्यात निष्पन्न झाली आहे. अनिकेत चौथे हा जळगाव पोलिस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप व त्यांचे सहकारी गोपाळ गायकवाड, ज्ञानेश्वर ढाकरे, विलास चव्हाण यांनी या कामगिरीत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment