किराणा दुकानातून पानमसाला, तंबाखूचा लाखोंचा माल जप्त

On: May 7, 2024 11:49 AM

जळगाव : विक्रीस बंदी असलेला पानमसाला व तंबाखूचा 1 लाख 30 हजार 985 रुपये किमतीचा मुद्देमाल एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. रविवार 5 मे रोजी मेहरुण परिसरातील संतोषी माता चौक भागात असलेल्या श्री स्वामी कृपा प्रोव्हिजनमधून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुकान मालक दीपक रमेशचंद गंगराळे  याच्याविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दुकानातुन एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने पानमसाला, तंबाखूचे पाऊच, तंबाखूचे 15 डबे असा एकूण 1 लाख 30 हजार 985 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मिळालेल्या माहीतीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील सपोनि ए. सी. मनोरे, पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकों गणेश शिरसाळे, पोकों हेमंत पाटील, कविता गवई, छगन तायडे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सपोनि आसाराम मनोरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment