आयएसआय एजंट कच्छमधून ताब्यात

On: August 31, 2020 6:06 PM

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी कार्यरत असलेल्या रजकभाई कुम्हारला कच्छ येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. रजकभाई कुम्हार हा मुद्रा डॉकयार्ड येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होता. एनआयए या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. गुरुवारी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) कच्छ येथील रजकभाई याच्या निवासस्थानी छापा घातला होता.हे प्रकरण १९ जानेवारी रोजी लखनौच्या गोमती नगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हयाशी संबंधित आहे. या प्रकरणी राशिद नावाच्या व्यक्तीस उत्तर प्रदेशातील चांदौली येथून अटक करण्यात आली. राशिदच्या अटकेनंतर तपासणीत समजले की राशिद हा देखील पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. रजकभाई कुम्हार हा एजंट गुजरातमधील पश्चिम कच्छ मधील आहे. दोघे एकमेकांशी संलग्न आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment