चॉपरने हल्ला करत तरुणाचा खून 

On: May 23, 2024 8:10 AM
crimeduniya

जळगाव : हॉटेलमध्ये मित्रासोबत जेवण करत असलेल्या तरुणावर अचानक आलेल्या काही तरुणांनी चॉपरचे सपासप वार करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर हल्लेखोर तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. या जीवघेण्या हल्ल्यात जखमी तरुण मृत्युमुखी पडला. जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात 22 मे च्या रात्री दहा वाजता घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. किशोर अशोक सोनवणे (कोळी) रा. कोळी पेठ, बालाजी मंदिराच्या मागे, जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. 

कालिंका माता मंदिर परिसरात 22 मे च्या रात्री दहा वाजेच्या सुमारास एका हॉटेलमधे किशोर हा त्याचा मित्र अमोल सोनार  याच्यासह जेवण करण्यास बसला होता. त्याचवेळी आलेल्या काही तरुणांनी त्याच्यावर चॉपरने सपासप वार करत त्याला जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. किशोर सोबत असलेला त्याचा मित्र अमोल सोनार यांच्याकडून पोलीस पथकाने अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जुन्या वादातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment