चोरीच्या दोन मोटार सायकलींसह दोघांना अटक

On: June 9, 2024 4:58 PM

जळगाव : चोरीच्या दोन मोटारसायकलींसह दोघा चोरट्यांना चाळीसगाव शहर  पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध  पथकाने अटक केली आहे. बापुजी उर्फ लखन बळीराम राठोड आणि विवेक गणु आडे (दोघे रा. बेलखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर) असे अटकेतील दोघांची नावे आहेत. सक्त पेट्रोलींग दरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघा चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले.

दोन मोटार सायकल चोरटे त्यांच्या ताब्यातील चोरीच्या मोटार सायकली बाजार समितीमधे विक्रीसाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर  पोलिस स्टेशनचे पो.नि. संदिप पाटील यांना समजली होती. त्या माहितीची खात्री केली असता अंधारात आलेल्या दोघा मोटार सायकलस्वारांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता सत्य बाहेर आले. दोघांच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्या मोटार सायकली कल्याण – ठाणे परिसरातून चोरी केल्याचे दोघांनी कबुल केले.

पोकॉ समाधान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं. 248/24 नुसार चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला पोलिस अधिनियम कलम 124 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संदीप पाटील, पोहेकॉ राहुल सोनवणे, पोहेकॉ अजय पाटील, पोना भुषण पाटील, पोना महेंद्र पाटील, पोकॉ विजय पाटील, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ पवन पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर गिते, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ समाधान पाटील, पोकॉ राकेश महाजन, पोकॉ मनोज चव्हाण आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ अजय पाटील व पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment