चोरीच्या डीजे साहीत्यासह दोघे जेरबंद

On: June 9, 2024 8:48 PM

जळगाव : फैजपूर परिसरातून डीजेच्या वाहनातील ऍम्प्लिफायर, वायर, मिक्सर व इतर साहित्य असे चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना फैजपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. सिताराम बदा भिलाला आणि राजू मोहन भिलाला अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. 

दिनांक 12 व 13 मे 2024 दरम्यान फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील न्हावी या गावी जुना सरकारी दवाखाना परिसरात मारुळ रोडवर मोकळया जागेत उभ्या असलेल्या डीजेच्या वाहनातील सुमारे 83 हजार रुपये किमतीचे साहीत्य चोरी झाले होते. या चोरी प्रकरणी विक्रम वामन तायडे यांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द फैजपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास न्हावी बीटचे सहाय्यक फौजदार देविदास सुरदास करत होते. तपासा दरम्यान दोघा चोरट्यांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment