विहिरीत ढकलून पत्नीने केली पतीची हत्या 

On: June 13, 2024 3:33 PM

जळगाव : दिव्यांग पतीला त्याच्या पत्नीने विहिरीत ढकलून त्याचा मृत्यू घडवून आणल्याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 जून रोजी घडलेल्या या घटनेची मयताच्या काकाने धरणगाव पोलीस स्टेशनला बदनामीच्या धाकाने उशिरा माहिती दिली. दिव्यांग पतीला विहिरीत ढकलणाऱ्या पत्नीचे गावातील एका जणासोबत प्रेमसंबंध होते असे म्हटले जात आहे. या प्रेमसंबंधात दिव्यांग पतीचा अडथळा होता, म्हणून ही अप्रिय घटना घडल्याचे देखील म्हटले जात आहे. 

धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या घटने प्रकरणी संशयित पत्नीला अटक करण्यात आली आहे. पत्नीच्या प्रेम संबंधावरून मयत पतीचे पत्नीसोबत नेहमी वाद होत असत. मयत पतीच्या काकाने दिलेल्या फिर्यादीनुसार धरणगाव पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment