आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिव कॉलनीत योगा सेमिनार

On: June 21, 2024 11:22 AM

जळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त येथील शिव कॉलनी परिसरात महिलांसाठी मोफत योगा सेमिनारचे आयोजन करण्यात आले. योग  शिक्षिका सौ. कविता सोनार यांनी या सेमिनारचे आयोजन केले होते. या सेमिनारला महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.

योग शिक्षिका सौ. कविता सोनार यांनी सहभागी महिलांचा उत्साह वाढवत योगाचे महत्व कथन  केले. यावेळी सुमारे पन्नास महिलांनी सहभाग नोंदवला. योगा आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे हे उपस्थित महिलांनी यावेळी जाणून घेतले. योग शिक्षिका यांनी यावेळी उपस्थित महिलांना काही टिप्स देखील दिल्या. महिलांना होणा-या  विविध व्याधींवर योगामुळे कशा प्रकारे मात करता येते हे देखील योगा सेमिनार मधे  सहभागी महिलांनी समजून घेतले. मोठ्या उत्साहात हे सेमीनार संपन्न झाले.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment