लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू

On: September 1, 2020 9:59 PM

नाशिक : अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप दिला जात असतांना नाशिक जिल्ह्यात एक दुर्घटना घडली. देवळा तालुक्यातील वखाली येथे गणेश विसर्जन करण्यास गेलेल्या लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. प्रशांत वसंत गुंजाळ (27) असे मयत लष्करी जवानाचे नाव आहे.प्रशांत गुंजाळ हा सैनिक अरुणाचल प्रदेशात लष्करात कार्यरत आहेत. तो दोन महिन्यासाठी सुटी घेवून घरी आला होता. प्रशांत यांचं घर मळ्यात असल्यामुळे मळ्यातील विहिरीवर तो गणेश विसर्जनासाठी गेला होता. गणपती विसर्जन प्रसंगी प्रशांत गुंजाळ यांचा तोल जावून तो विहीरीत पडला. खोल विहीरीत जास्त पाणी असल्यामुळे त्याला आपला जीव वाचवणे शक्य झाले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment