आजचे राशी भविष्य (14/7/2024)

आजचे राशी भविष्य (14/7/2024)

मेष : नेतेमंडळींची लोकप्रियता वाढेल. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल.

वृषभ : शासकीय कामे रखडतील. प्रयत्नास दैवाची साथ नक्की लाभेल.

मिथुन : व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागेल. मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील.

कर्क : विनाकारण होणारे वाद टाळावे लागतील. कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

सिंह : कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. सकाळचे मतभेद संध्याकाळपर्यंत मिटतील.

कन्या : दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता. दिलेले शब्द पाळाल.

तूळ : कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ द्यावा लागेल. व्यस्त दिवस राहील.

वृश्चिक : नोकरदारांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. लेखकांचे लिखाण प्रसिद्ध होईल.

धनू : विविध मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता. गायक मंडळींना चांगला दिवस राहील.

मकर : आज स्वत:चे लाड पुरवाल. उच्च राहणी – उच्च विचारसरणी असे आज धोरण राहील.

कुंभ : आवश्यक खर्च पुढे येतील. जमाखर्चाचा मेळ घालणे जरा अवघड होईल.

मीन : गैरसमजाने दुरावलेले नातलग जवळ येतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here