डोक्यात दगड घालून महिलेची हत्या – तरुणास अटक 

On: July 1, 2024 4:44 PM

जळगाव : डोक्यात दगड घालून विधवा महिलेची हत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील शहापूर या गावी उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी किरण कोळी या संशयीत तरुणास अटक करण्यात आली आहे. ही घटना नेमकी आर्थिक वादातून झाली की अनैतिक संबंधातून याबाबत परिसरात उलट सुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत काही तासातच संशयित किरण कोळी यास ताब्यात घेत पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली. या घटनेप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला नव्याने अमलात आलेल्या खूनाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मयत विधवा महिला संगिता हिचे संशयीत आरोपी किरण संजय कोळी ऊर्फ लहान्या याच्यासोबत समाजाला मान्य नसलेले संबंध असल्याची चर्चा सुरु होती. त्या संबंधातून दोघात आर्थिक वाद निर्माण झाले होते असे समजते. दोघातील वाद विकोपाला गेल्यामुळे संतापाच्या भरात किरण याने संगिता हिचा दगडाने ठेचून खून केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक दिपक रोटे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment