जळगाव उप कारागृहात झालेल्या हल्ल्यात बंदीवानाचा मृत्यू

On: July 10, 2024 11:57 AM

जळगाव : आपसातील वादातून जळगाव उप कारागृहात एका बंदिवान तरुणाने दुसऱ्या बंदिवान तरुणास जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आज 10 जुलैच्या सकाळी ही घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. मोहसीन असगर खान असे मयत बंदीवानाचे नाव आहे. 

या घटनेतील मयत बंदिवान मोहसीन अजगर खान याचा दुसऱ्या एका बंदीवानासोबत वाद झाला होता. त्या वादातून झालेल्या हल्ल्यात जखमी बंदीचा मृत्यू झाला आहे. 

भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात याची 7 ऑक्टोबर 2019 रोजी भुसावळ येथे हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. अटकेतील हे संशयित आरोपी जळगाव उप कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. या खून प्रकरणातील संशयित आरोपी मोहसीन असगर खान याचे दुस-या बंदीवना सोबत काल दुपारी भांडण झाले होते. या दोघांमध्ये अंतर्गत धुसफुस सुरु होती. त्यातून मोहसीन असगर खान हा गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment