जळगाव शहरात घरफोडी करणारी टोळी जेरबंद

On: July 10, 2024 7:08 PM

जळगाव : जळगाव शहरात घरफोडी करणाऱ्या टोळीतील तिघांसह चोरीचे सोने चांदीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफ बाजारातील चौथ्या इसमाला देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. विशाल मुरलीधर दाभाडे, शुभम उर्फ मोनु प्रभाकर चव्हाण (दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) विशाल संतोष भोई (रा तांबापुरा जळगाव) आणि सराफ बाजारातील नेताजी पंढरीनाथ जगताप अशी चौघांची नावे आहेत.

अटकेतील तिघांनी दिलेल्या माहितीची खात्री केली असता जळगांव शनीपेठ पो स्टे हद्दीतील दशरथ नगर व सुदर्शन पार्क तसेच जिल्हापेठ पो.स्टे. हद्दीतील चंद्रप्रभा कॉलनी अशा तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांचे एकुण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पोउनि  राहुल तायडे, सफौ रवी नरवाडे, संजय हिवरकर, पोहॅकॉ कमलाकर बागुल, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, चालक मोतीलाल चौधरी आदींनी या तपास कामी सहभाग घेतला. अटकेतील सर्वांना पुढील तपासकामी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment