ट्रॅक्टर चोरट्यास एलसीबी पथकाने केले जेरबंद

On: July 16, 2024 4:49 PM

जळगाव : ट्रॅक्टर वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. रमेश उर्फ अनिल काशीनाथ सोनवणे (रा. सावखेडा – भिलाटी ता.जि. जळगांव) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याने सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी जळगाव तालुक्यातील सावखेडा या गावातून ट्रॅक्टर चोरी केले होते.

सावखेडा येथील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या समांतर तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सराईत गुन्हेगार रमेश उर्फ अनिल सोनवणे याने सावखेडा गावातून एक ट्रॅक्टर चोरी केल्याची गोपनीय माहिती तपास पथकाला समजली. त्या माहितीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात आला. मुसळधार पावसातही त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस अंमलवार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील, ईश्वर पाटील यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. त्याच्या ताब्यातून या गुन्हयातील चोरीस गेलेले अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर (एमएच 19 एपी 5076) जप्त करण्यात आले आहे. आरोपीसह ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment