तीन लाख रुपयांसह बॅग लिफ्टरला अटक 

On: July 22, 2024 4:40 PM

जळगाव : बँक, बस स्थानक आदी गर्दीच्या ठिकाणी पैशाच्या बॅगा चोरणा-या म्होरक्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा येथून अटक केली आहे. बसंत बनवारीलाल शिसोदिया रा. कढीयागाव ता. पचोर जि. राजगढ मध्यप्रदेश असे त्याचे नाव आहे. अंगझडती दरम्यान त्याच्याकडून 3 लाख 18 हजार रुपये हस्तगत करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पाचोरा आणि पारोळा या तीन पोलीस स्टेशनला दाखल रोकड भरलेल्या बॅग चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अटकेतील बसंत सिसोदिया हा दोन दिवसांपुर्वी  पारोळा शहरात बॅग चोरी करण्यासाठी आला होता. मात्र यावेळी तो पोलिस पथकाच्या हाती लागला आणि यापूर्वी दाखल गुन्हे उघडकीस आले. 

दोन दिवसापुर्वी पारोळा शहरातील स्टेट बॅंक परीसरात पैशाची बॅग चोरी करणारी टोळी पुन्हा चोरीच्या उद्देशाने पारोळा शहरात आली असून संशयीरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकास समजली होती. त्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या चोरट्यांच्या मागावर होते. पारोळा शहरातील धरणगाव माथाळा भागातून बसंत बनवारीलाल शिसोदिया यास संशयास्पद अवस्थेत फिरतांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. 

दोन दिवसांपूर्वी पारोळा शहरात केलेल्या बॅग चोरीच्या गुन्ह्यात त्याने आपला साथीदार रिशी सिंगदर सिसोदीया व विशाल ऊर्फ मोगली सिसोदीया रा. गुलखोडी ता. पचोर जि. राजगढ यांचा देखील सहभाग असल्याचे कबूल केले. अटकेतील वसंत शिसोदिया यास पारोळा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि राहुल तायडे, पोउनि गणेश वाघमारे, पोहवा नंदलाल पाटील, पोहवा प्रमोद लाडवंजारी, पोहवा किरण धनगर, पोना भगवान पाटील, राहुल बैसाणे, पोकॉ ईश्वर पाटील, चालक पो कॉ प्रमोद ठाकुर आदींच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासणी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment