पत्नीवर प्राणघातक हल्ला करणा-या पतीला अटक

On: July 29, 2024 2:16 PM

जळगाव : पतीचे विवाहबाह्य संबंध पत्नीला मान्य नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात प्राणघातक हल्ला करणा-या पतीविरुद्ध जखमी पत्नीने एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील फरार पतीला एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जामनेर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. अजय चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

4 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास या घटनेतील अजय चव्हाण याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात व हातापायावर लोखंडी रॉड मारुन दुखापत केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.नं. 438/24 भारतीय न्याय संहिता कलम 117(2), 118(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरार अजय चव्हाण हा जामनेर येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी रवाना केलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. पोलिस उप निरीक्षक निलेश गोसावी, पोलिस उप निरीक्षक रविंद्र चौधरी, पोलिस नाईक विकास सातदिवे, पो. कॉ. राहुल पाटील, पो.कॉ. नितीन ठाकुर व जामनेर पोलिस स्टेशनचे पो.कॉ. लहासे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment