पुणे दरोडयातील आरोपी पकडले जळगाव एलसीबीने

On: August 2, 2024 10:09 PM

जळगाव : पुणे शहर चतृःश्रृंगी पोलीस स्टेशनला दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील तिघा संशयित आरोपींना जळगाव एलसीबी पथकाने  कानळदा गावातून पकडण्यात यश मिळवले आहे. जितेंद्र उर्फ जितु प्रदिप वाघ (रा.वाघ नगर जळगाव), भुषण गोकुळ कोळी (रा.समतानगर जळगाव) आणि चंद्रशेखर उर्फ चंदु रमेश देशमुख (रा. महाबळ जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. 

तिघे संशयित आरोपी कानळदा येथे असल्याबाबतची माहिती पो.कॉ. रविंद्र श्रावण कापडणे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे, पोहॅकॉ महेश महाजन, हेमंत पाटील, रविंद्र कापडणे, राहुल कोळी आदींनी तिघांना कानळदा ते भोकर रोड परिसरातून ताब्यात घेतले. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment