चाळीसगावचा तडीपार गुंड जगदीश महाजन यास अटक

On: August 5, 2024 12:34 PM

जळगाव : चाळीसगाव शहर तसेच जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आरोपी जगदीश महाजन यास अटक करण्यात आली आहे. जगदीश महाजन यास जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असतांना देखील तो चाळीसगाव शहरात फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला रवाना केले असता तो चाळीसगाव शहरातील वसंत डेअरी नजीक आढळून आला. 

पोलीस उपनिरीक्षक, योगेश माळी, पोकॉ पवन पाटील, रविंद्र बच्छे, गोपाल पाटील आदींनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने आरडाओरड व धक्काबुक्की करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध अटकेची कारवाई केली. 

भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 132, 121(1), 351(3), 352 सह महा.पोलीस अधिनियम 142 प्रमाणे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील व पोहेकॉ विनोद भोई करत आहेत. आरोपी जगदीश महाजन हा सराईत गुन्हेगार असून त्यावर शरीराविरुद्धचे व अंमली पदार्थ अवैध मार्गाने विक्री प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment